संत मेरी जॉन व्हियाना धर्मगुरूंचा आश्रयदाता सण नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चमध्ये उत्साहात साजरा
नेवासा, दि. ४ ऑगस्ट (प्रतिनिधी) — संत मेरी जॉन व्हियाना या धर्मगुरूंच्या आश्रयदात्याचा सण रविवार, ३ ऑगस्ट रोजी नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चमध्ये अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.
या पवित्र प्रसंगी ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव यांनी पवित्र मिसा अर्पण केली. त्यांच्या समवेत सहायक धर्मगुरू अक्षय आढाव आणि धर्मगुरू लोंढे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान या तिन्ही धर्मगुरूंचा गौरव आणि सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास चर्चचे उपाध्यक्ष श्री. हरीश पंडित, श्री. शंकरराव सर, श्रीमती चक्रनारायण ताई, श्रीमती धोंगडे ताई, श्री. मिखाइल पातारे सर, श्री. मार्कस भाऊ बोर्डे, विजय लोंढे सर, विष्णू खांदोडे सर, उत्तम गायकवाड, घोरपडे गुरुजी, बाळासाहेब साळवे, सत्यदान गायकवाड, राजेंद्र बनसोडे, संजय हिवाळे, संजय वाघमारे, वैभव मगर, अलिषा ताई मगर, सनी गायकवाड, नंदेश बोर्डे, प्रशांत बोर्डे, राजेंद्र पंडित, राजेंद्र पवार तसेच अनेक मान्यवर आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंट मेरी स्कूल व सेंट जोसेफ हायस्कूल मधील सर्व धर्मभगिनी, समाज विकास समिती व होस्टेलमधील मुली, तसेच तरुण युवक मंडळाचे अध्यक्ष अक्षय बनसोडे व त्यांच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन करण्यात मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांनी एकत्र सहभोजनाचा आनंद घेतला. या आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.