नेवासा प्रेस क्लबच्या वतीने जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांना आलेल्या धमकीचा निषेध



नेवासा प्रेस क्लबच्या वतीने जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांना आलेल्या धमकीचा निषेध

नेवासा प्रतिनिधी:- 
श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक अँड.बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाकडून सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
     जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांचे सर्व कुटुंबातील प्रमुख विधी तज्ञ असून जिल्हयातील क्राईम रिपोर्टिंग मध्ये 
त्यांचे दैनिक निर्भीडपणे लिखाण करत असते.असेच गुन्हेगारीवर वास्तववादी लिखाण त्यांनी केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांकडुन आलेल्या धमकीचा नेवासा प्रेस क्लब जाहीरपणे निषेध करत धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
   सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले.यावेळी प्रेस क्लबचे मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे,अशोक डहाळे,प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड,कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,नानासाहेब पवार, उपाध्यक्ष कैलास शिंदे,शाम मापारी,रमेश शिंदे,सुहास पठाडे,शंकर नाबदे,मकरंद देशपांडे,पवन गरुड उपस्थित होते


चौकट- सदरील आरोपी लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून चौथा स्तंभ सुरक्षित राहील व जनसामान्य नागरिकांचा विश्वास न्याय व्यवस्थे वर राहील.
मोहन गायकवाड
प्रेस क्लबचे अध्यक्ष

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.