*कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या नसून हत्या- ऍड.पांडुरंग औताडे*

*कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या नसून हत्या- ऍड.पांडुरंग औताडे* 


 नेवासा प्रतिनिधी. नेवासा तालुक्यातील वडुले गावचे शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी चार दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली प्रशासनाने संबंधित मृत्यूची नोंद अकस्मात म्हणून घेतली. तीन ते चार दिवस उलटून कुठलेही चौकशी अथवा पंचनामा करण्यात आला नाही याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना जीवन जगण्याचा अधिकार नाही अशी व्यवस्था असल्याचे प्रहार पदाधिकारी यांनी सांगितले. चौथ्या दिवशी संबंधी शेतकरी कुटुंबीयाला भेट देणारी माजी पंचायत समिती सदस्य व कुटुंबाचे सदस्य यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली सांगळे यांना संपर्क साधला व संबंधित शेतकऱ्याची अकस्मात मृत्यू नसून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आणून दिले ही माहिती मिळताच संपूर्ण प्रशासन जागे झाले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मागे भाऊ आई दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे प्रशासनाने सायंकाळी दखल घेतली यानंतर प्रहार पदाधिकारी यांनी वडुले गावात निषेध सभा वडोली ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केली होती यावेळी सरकारी योजनेने ही हत्या केली असल्याचे प्रहार पदाधिकारी यांनी आरोप केला या आत्महत्येस कर्जबाजारीपणा जबाबदार नसून शेती आणि शेतकऱ्याच्या विरोधात सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप सर्वपक्षीय शेतकरी यांनी केला यावेळी प्रहार चे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे यांनी सरकार जर हत्या करून आम्हाला उद्विग्न करत असेल तर फार शांत बसणार नाही असा इशारा दिला. प्रहार चे युवा जिल्हा प्रमुख यांनी सांगितले की प्रत्येक वेळेस मदतीची भीक देण्याऐवजी तो सोपा उपाय योजना करता येत नसतील तर सत्ताधारी यांनी भिकेचे चे नाटक करू नये यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सरकार वर दाखल करावा अशी मागणी केली. भैरवनाथ भारस्कर यांनी बाबासाहेब यांचे बलिदान हे व्यर्थ जाऊ देणार नाही असे सांगितले निषेध सभेत सरपंच परिषद शरद आरगडे, गळनिंब गावचे सरपंच प्रहार चे जिल्हा संपर्कप्रमुख यांनी तरुणांना मारण्याऐवजी मारायचे शिका असे सांगितले यावेळी वडोलीचे सरपंच दिनकर गर्जे यांनी कुटुंबाला आधारासाठी पक्षभेद विसरून काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. यावेळी पोपटराव सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले स्वाभिमानीचे आरले पाटील यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला या निषेध सभेसाठी प्रहार चे अरविंद आरगडे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग नवले, राजू आढावं, भाऊसाहेब सावंत, अवि ससाने, राजू आघाव, देवराव सरोदे, शंकरराव बारस्कर अशोकराव गरजे विजय मांडवत अण्णा गर्जे, संभाजी गर्ज, सचिन सरोदे जालिंदर बोरुडे बाबासाहेब गर्जे वडोली ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला यावेळी सर्व गावकरी भगिनी शेतकरी व सर्व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.