सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात ई सुश्रुत संगणकीय प्रणाली सरु
वैद्यकीय अधिक्षक डॉ. विठ्ठल कराड यांची माहिती
*सोनपेठ प्रतिनिधी| आशिष मुंढे*
सोनपेठः येथील ग्रामीण रुग्णालयात ई सुश्रुत संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली असून यामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची नोंदणी, तपासणी, व औषधोपचार यांसह अन्य माहिती रुग्णालयात संगणक प्रणालीवर नोंद होणार असल्याची माहिती सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विठ्ठल कराड यांनी आशिष दयानंद मुंढे यांना दिली आहे.
सोनपेठ तालुक्यातील १० ते १२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सोनपेठ तालुक्यातील विविध गावांमधील रुग्णांच्या सोयीसाठी ही संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची नोंदणी तपासणी व औषधोपचार घेण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार ई सुश्रुत संगणकीय प्रणाली मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास १८० ते २०० रुग्णालयात रुग्णांची नोंदणी केली आहे. यामध्ये सर्व रुग्णांची नोंदणी तपासणी व औषधोपचार ही ऑनलाईन सुविधा तयार करण्यात आली आहे. याची नोंदणी ई सुश्रुत संगणकीय प्रणाली केली जाणार आहे. यासाठी रुग्णांचा मोबाईल नंबर व आधार कार्ड आवश्यक आहे. येणाऱ्या काळात तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार मोफत ईलाज व सुविधा देण्यासाठी आभा स्कॅन अँन्ड केअर ही सुविधा चालु आहे. या सर्वयोजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत ? जास्त रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयात ई सुश्रुत संगणकीय प्रणालीवर नोंद करावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विठ्ठल कराड यांनी केले आहे