*सुर्यभान रणदिवे यांच्या जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी कुटुंबासह 15 ऑगस्ट रोजी अतिक्रमण स्थळी आत्मदहनाचा इशारा*

*सुर्यभान रणदिवे यांच्या जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी कुटुंबासह 15 ऑगस्ट रोजी अतिक्रमण स्थळी आत्मदहनाचा इशारा*

सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे महामार्गावर लगत असलेली सुर्यभान रणदिवे यांची नावे असलेले गट नं ३४२ मध्ये २ एकर ३ गुंठे जमीन आहे तसेच या जमिनीवर गावातील बाळू रघुनाथ कांदे,पवन भांडवलकर, दिलीप कांदे, विलास रणदिवे, रमेश रणदिवे, सह इतरांनी अतिक्रमण केले आहे. यामध्ये बाळू कांदे याने ३०x५० फूट क्षेत्रात पिठाची गिरणी व १०x१० फूट क्षेत्रात चाह पाणी हॉटेल सुरू केली आहे, पवन भांडवलकर १०x१० फूट क्षेत्रात पानटपरी चालवत आहे, विलास भानुदास रणदिवे १०x१० फूट क्षेत्रात पत्राचे शेड तयार केली आहे, रमेश भानुदास रणदिवे १०x१० फूट क्षेत्रात पत्राचे शेड तयार केली आहे, दिलीप कांदे याने २०x३० फूट क्षेत्रावर दगडांचा साठा करून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू केला, आहे.जमिनीवर अतिक्रमण केली असल्याने प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करुनही वयोवृध्द सूर्यभान रणदिवे यांच्या कुटुंबाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचीं वेळ आली असल्याने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनेचा निवेदनाद्वारे सोनपेठ नायब तहसिलदार यांना इशारा दिला या निवेदनावर सुर्यभान रणदिवे, पत्नी कांताबाई,मुलगी , भाग्यश्री,मुलगा गणेश रणदिवे, यांनी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.