नेवासा फाटा LIVE: गाडे नगर मध्ये गॅलरीतून सुपरविजन, चोर पकडायला मोबाईलवरून मार्गदर्शन



"नेवासा फाटा LIVE: गाडे नगर मध्ये गॅलरीतून सुपरविजन, चोर पकडायला मोबाईलवरून मार्गदर्शन

नेवासा फाटा (प्रतिनिधी) –
गाडे नगरमध्ये चोरांचा सुळसुळाट एवढा वाढलाय की आता प्रशासकीय अधिकारी, शिक्षक मंडळींच्या डोळ्यांत भीतीचे भाव पक्के घर करायला लागलेत. पण गाडे नगरचे काही डॅशिंगबाज नागरिक तटस्थ भूमिका घेऊन 84 दोन हात करण्याची तयारी दर्शवत आहे 

काल रात्री मध्याच्या च्या सुमारास एक विचित्र पण खुपच मनोरंजक प्रसंग घडला. एका घराच्या गॅलरीत उभ्या असलेल्या भाऊंचा फोन कॉल संपूर्ण कॉलनीमध्ये चर्चेचा विषय ठरला.
"हॅलो... हॅलो... हो मी गॅलरीमध्येच आहे, वरून सगळं दिसतंय... तू पुढे हो... समोर जो झाडामागे आहे ना, बहुधा तोच चोर असावा!" – असं म्हणत ते मित्रांना चोर शोधायचं मार्गदर्शन करत होते.

तेव्हा पर्यंत गल्लीतले इतर काही धाडसी लोक काठी घेऊन "वॉच डॉग" स्टाईलने गल्ली तुडवत होते, आणि काही लोक केवळ WhatsApp वर "सावधान! चोर गाडे नगरमध्ये!" असे फॉरवर्ड करत चोराला नेटवर व्हायरल करत होते.

गमतीशीर गोष्ट अशी की, चोर मात्र कुठेच सापडला नाही, पण गॅलरीत उभ्या राहून 'ड्रोन व्हिजन' देणाऱ्या नागरिकांचा उत्साह मात्र जबरदस्त होता.
एका महिलेने तर चक्क आपल्या नवऱ्याला सांगितलं – "घाबरू नको, तू खाली उतरू नकोस... मी वरून बघते, CCTV मीच आहे!"तसेच काही सुजाण नागरिकांचे असे मत आहे की या चोरीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी येथे सिक्युरिटी गार्ड कॉलनीच्या वतीने नेमण्यात यावे जेणेकरून नागरिकांना सुरक्षा मिळेल व चोरीच्या प्रकारावर आळा घातला जाईल

चौकट
गाडे नगरमध्ये रात्री फिरणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर आता शंका घेतली जातेय. कारण चोर माणूस असेलच असं कोण म्हणालंय?




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.