नेवासा तालुक्यात महिलांचा उदय; ८८ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर महिलांचा कारभार निश्चितसोनई, पाचेगाव, चांदा, खरवंडीसह महत्त्वाच्या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित



नेवासा तालुक्यात महिलांचा उदय; ८८ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर महिलांचा कारभार निश्चित

सोनई, पाचेगाव, चांदा, खरवंडीसह महत्त्वाच्या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित

नेवासा | न्यूज नेटवर्क | २५ जुलै २०२५

नेवासा तालुक्यात २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठी ८८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी नेवासा तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये ४१ ग्रामपंचायती सरळपणे महिलांसाठी आरक्षित झाल्या असून यामध्ये सोनई, पाचेगाव, बेलपिंपळगाव, चांदा, खरवंडी, वडाळा बहिरोबा यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या आरक्षण सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार, नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरेचांगदेव बोरुडे उपस्थित होते. तालुक्यातील एकूण ११४ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींसाठी २०२१ चे आरक्षण कायम ठेवण्यात आले असून, उर्वरित ८८ ग्रामपंचायतींसाठी ही नवीन सोडत जाहीर करण्यात आली आहे.


🗂 आरक्षणानुसार वर्गवारी (८८ ग्रामपंचायतींवर आधारित)

प्रवर्ग स्त्री राखीव व्यक्ती (खुला)
खुला प्रवर्ग २० २४
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) ११ १३
एकूण ४१ ४७

🌸 स्त्री सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती

खुला प्रवर्ग - स्त्री राखीव (२० ग्रामपंचायती)

सोनई, पाचेगाव, बेलपिंपळगाव, चांदा, खरवंडी, वडाळा बहिरोबा, सुलतानपूर, तरवडी, टोका, पाचुंदे, शिरेगाव, उस्थ, दुमाला, शिंगवे तुकाई, माका, वरखेड, वाकडी, नजीक चिंचोली, बहिरवाडी, माळीचिंचोरा, कौठा

अनुसूचित जाती - स्त्री राखीव (६ ग्रामपंचायती)

मांडेगव्हाण, रामडोह, बऱ्हाणपूर, खुणेगाव, सुरेगाव गंग, उस्थळ खालसा

अनुसूचित जमाती - स्त्री राखीव (४ ग्रामपंचायती)

वाटापूर, निंभारी, जळके बु., कारेगाव

OBC - स्त्री राखीव (११ ग्रामपंचायती)

भेडा बु., देडगाव, दिघी, खडका, कुकाणा, मंगळापूर, नारायणवाडी, घोगरगाव, खुपटी, भानसहिवरे, खेडले परमानंद


👤 पुरुष किंवा खुला वर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती (४७ ग्रामपंचायती)

🔸 खुला प्रवर्ग - व्यक्ती (२४ ग्रामपंचायती)

रांजणगाव, सलाबतपूर, जेऊर हैबती, सौंदाळा, पुनतगाव, तामसवाडी, बाभूलखेडे, बकूपिंपळगाव, देवगाव, देवसडे, गळनिंब, गेवराई, हंडीनिमगाव, हिंगोणी, मक्तापूर, लोहगाव, म्हालसपिंपळगाव, मोरयाचिंचोरे, पिचडगाव, प्रवरासंगम, सुरेशनगर, तेलकुडगाव, वांजोळी, पिंप्रीशहाली

🔸 अनुसूचित जाती - व्यक्ती (७ ग्रामपंचायती)

अंमळनेर, शहापूर, गोणेगाव, लांडेवाडी, शिंगणापूर, बेल्हेकरवाडी, मुकिंदपूर

🔸 अनुसूचित जमाती - व्यक्ती (३ ग्रामपंचायती)

पानेगाव, जैनपूर, गोंडेगाव

🔸 OBC - व्यक्ती (१३ ग्रामपंचायती)

रस्तापूर, भालगाव, फत्तेपूर, कांगोणी, मुरमे, निपाणी निमगाव, नवीन चांदगाव, चिंचबन, नागापूर, जळके खुर्द, भेंडे खुर्द, करजगाव.

या आरक्षण सोडतीतून महिलांना मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सोनई, पाचेगाव, चांदा, खरवंडी यांसारख्या प्रभावशाली गावांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुका महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ठरणार आहेत.

या बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि समाजात महिलांच्या सक्षम नेतृत्वाची जाणीव प्रकर्षाने होणार असून ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाला एक नवी दिशा मिळणार आहेत 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.