नेवासाफाटा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन...


नेवासाफाटा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन...

नेवासा प्रतिनिधी--नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी दि.२४ जुलै रोजी सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी ही मोठया सहभागी झाले होते.
 प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर औताडे, युवा जिल्हाध्यक्ष अँडव्होकेट पांडुरंग औताडे, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे,जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले यांनी चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व केले.           
नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकात झालेल्या आंदोलन प्रसंगी "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे" "बच्चू कडू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है"अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.यावेळी प्रहारचे जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे कॉम्रेडचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण पाटील कडू यांनी मनोगत व्यक्त केले. 
आंदोलन शांततेत पार पडले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होत  यावेळी झालेल्या आंदोलन प्रसंगी संभाजीनगर हायवेवर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांच्या महसूल अधिकाऱ्याला यावेळी निवेदन देण्यात आले.या आंदोलनात प्रहारचे युवा तालुकाध्यक्ष विकास कोतकर,युवा नेते कमलेश नवले,पांडुरंग नवले,राजेंद्र कळस्कर,प्रविण विधाटे, शेतकरी संघटनेचे अशोक काळे,त्रिंबकराव भदगले, सरपंच अशोक  टेमक, रघुनाथ आरगडे,सोमा सांगळे,संदीप पाखरे,अरविंद आरगडे,सचिन साबळे,भाऊराव शेंडगे,शुभम गव्हाणे, अमोल सांगळे,दत्तू शिरोळे,श्याम आरगडे,ओम आरगडे भागचंद आरगडे, महेश मिसाळ,अमोल जोगदंड, संदीप गोरे, विठ्ठल उभेदळ,सागर साबळे,विजय गोरडे, शिवाजी दोडके, लहू कोळेकर, संदीप जाधव,भैय्या वाबळे, जगदीश शिंदे, प्रतीक नवथर यांच्यासह परिसरातील शेतकरी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.