🌿 श्रावणातील पहिल्या शनिवारी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरला दर्शन 🌿
शनिदेवाच्या कृपादृष्टीसाठी जनतेच्या कल्याणाची प्रार्थना
शनिशिंगणापूर प्रतिनिधी.श्रावण महिन्याचा पहिला शनिवार अत्यंत पवित्र मानला जातो. या मंगल दिनाचे औचित्य साधून आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे जाऊन श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्व जनतेच्या सुख-समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली
शनी मंदिर परिसरात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. आमदार लंघे पाटील यांनी शनिदेवाच्या मूर्तीसमोर पूजा-अर्चा करून भक्तिभावाने दर्शन घेतले.
या विशेष प्रसंगी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अंकुशराव काळे पाटील, सरपंच ललित मोटे, पोलीस पाटील श्री. सायराम बानकर, संदीप दादा बानकर, सुनील वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरले होते. श्री शनिदेवाच्या चरणी करण्यात आलेल्या प्रार्थनेत, "श्री शनिदेव सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव ठेवो," अशी भावना व्यक्त करण्यात आली.