नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरातील वाद झाकण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न; सीसीटीव्ही फुटेज लीक प्रकरणी उशिरा जाग येतेय!"




"नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरातील वाद झाकण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न; सीसीटीव्ही फुटेज लीक प्रकरणी उशिरा जाग येतेय!"

नेवासा (प्रतिनिधी) – एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर मंदिरात घडलेल्या दर्शन वादंगाची माहिती झाकण्यासाठी मंदिर प्रशासन जाणीवपूर्वक पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे गेले, याबाबत उशिरा चौकशी जाहीर करून मंदिर प्रशासन आता ‘डॅमेज कंट्रोल’च्या भूमिकेत आल्याचे स्पष्ट दिसते.

कामिका एकादशी दिवशी मंदिर प्रांगणात संस्थानचे विश्वस्त आणि एका स्थानिक उद्योजकात दर्शनावरून वाद झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमुळे देवस्थानच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, "हे फुटेज लीक कसे झाले?"यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे 

संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात एकादशीच्या दिवशी घडलेल्या दर्शन वादाचा सीसीटीव्ही व्हिडिओ बाहेर आल्यानंतर उडालेल्या खळबळीनंतर प्रशासन हादरलं असलं तरी, ही घटना झाकून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न आधीच सुरू होता, हे स्पष्टपणे समोर येत आहे.

या सगळ्या प्रकरणात लोकशाहीचा चौथा स्तंभ – काही निर्भीड पत्रकार व स्थानिक माध्यमांनी जागरूक भूमिका घेतली नसती, तर हे प्रकरण गुपचूप मिटवण्याचा कट रचला गेला असता, असा आरोप आता वारकरी आणि जनतेकडून होत आहे.


हा खरा मुद्दा असूनही, प्रशासनाने या घटनेची सुरुवातीस दुर्लक्ष करून जबाबदारी झटकली.

देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना "चौकशी करू" अशी घिसी-पिटी आश्वासने दिली, मात्र कोणत्याही ठोस कारवाईची माहिती दिली नाही. "मंदिर सर्वांच्या आस्थेचा विषय आहे" हे सांगताना, मंदिरात झालेल्या गैरप्रकारांची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न मात्र त्यांनी टाळला.

विशेष म्हणजे, ही घटना कामीका एकादशीच्या दिवशी घडूनही देवस्थान प्रशासनाने त्वरित खुलासा का दिला नाही? असा सवाल आता वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक विचारत आहेत. "जेव्हा सोशल मीडियावर प्रकरण पेटले, तेव्हाच प्रशासनाला जाग आली का?" असा संशय व्यक्त होत आहे.


सर्वसामान्य भाविकांच्या सुरक्षेची आणि गोपनीयतेची हमी घेणाऱ्या देवस्थान प्रशासनाचेच जर फुटेज बाहेर जात असेल, तर मंदिराचा कारभार किती असुरक्षित आहे, हे यातून दिसून येते. "मंदिर प्रशासनच जबाबदार की कोणी आतून माहिती देतंय?" यावर उत्तर शोधण्याऐवजी, प्रशासन केवळ जुजबी चर्चेवर समाधान मानत आहे.

आज जर समाजमाध्यमे आणि स्थानिक पत्रकारांनी निर्भीडपणे ही घटना उघड केली नसती, तर एकादशीच्या दिवशी मंदिरात झालेला गोंधळ दबून गेला असता. मंदिर प्रशासनाने केवळ चौकशी जाहीर करून जबाबदारी झटकू नये, तर दोषींवर कठोर कारवाई करावी, विश्वस्त मंडळात पारदर्शकता आणावी, आणि भाविकांच्या श्रद्धेचा विश्वास परत मिळवावा, अशी जनतेची जोरदार मागणी आहे.

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आवारात
एकादशीच्या दिवशी दर्शनावरून विश्वस्त व
उद्योजकांमध्ये झालेल्या वादंगप्रकरणी दोन्ही बाजूंनी
चर्चा करण्यात आली आहे. या प्रकारावर पडदा
पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर
कोणीही अफवा पसरू नये. तसेच देवस्थानमधून या
प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर गेल्याप्रकरणी
चौकशी करण्याचे आश्वासन देवस्थानचे अध्यक्ष
पांडुरंग अभंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
कामिका एकादशी दिवशी दुपारी मंदिर प्रांगणात
संस्थानचे एक विश्वस्त व उद्योगपती यांच्यात
दर्शनावरून वादंग झाले. या वेळी काही मंडळी यांनी
सावरासावर करण्याचे प्रयत्नही केले व विषयावर
पडदा पडला. मात्र, याच घटनेचे लोण दोन दिवसांत
तालुक्यातील सोशल मीडियावर पसरले आणि पुन्हा
वादाचा विषय ऐरणीवर आला. यात काही वारकरी,
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळीही उतरली.
फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअॅप अशा ठिकाणी टीका
टिप्पणी सुरू झाल्याने स्थानिक पत्रकारांनी
देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांची भेट घेऊन
चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कामिका
एकादशीनिमित्त पैस खांबाच्या दर्शनावरून वादंग
झाले होते. असा प्रकार धार्मिक ठिकाणी नाही झाला
पाहिजे. मंदिरात घडलेला प्रकार चुकीचा आहे. मंदिर
सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. विश्वस्त व उद्योजक
यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी दोघांनी
समजूतदारपणा दाखवला आहे. पुन्हाही आपण चर्चा
करणार आहोत. वादंगावर पडदा पडल्यानंतर पुन्हा
देवस्थानमधील सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओच्या
व्हायरसने चर्चा सुरू झाल्याने याबाबत आपण
चौकशी करणार असून, त्यानंतरच दोषींवर
कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अभंग
यांनी पत्रकारांना सांगितले.

आज वादंगावर पडदा पडल्यानंतर पुन्हा
देवस्थानमधील सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओच्या
व्हायरल चर्चा सुरू झाल्याने याबाबत आपण
चौकशी करणार असून, त्यानंतरच दोषींवर
कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पांडुरंग अभंग यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सांगितले.या वेळी विश्वस्त रामभाऊ जगताप, कृष्णा
पिसोटे. माऊली शिंदे आदी उपस्थित होते.


तसेच विश्वस्त की राजकीय पुढारी? अशी चर्चा नेवासा तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे देवस्थान प्रशासनाने जर आपल्या कर्मचाऱ्यांपेक्षा राजकीय पुढाऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला, तर लवकरच श्रद्धेचं हे ठिकाण वादांचं केंद्र बनू शकतं. तसेच काही राजकीय पक्षांचे पुढारी आम्ही फेसबुक लाईव्ह येत आहे अशा पोस्ट टाकून जनतेमध्ये समभ्रम निर्माण करीत आहे तसेच सदर प्रकरणाबाबत काय कारवाई होती हे येणारा वेळ सांगेल

 तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिराच्या सुरक्षेसाठी चांगल्या प्रकारचे सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे अशी सुजान नागरिकांमध्ये चर्चा आहे











Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.