*भाजपच्या राज्य परिषदेवर निवड झाल्याबद्दल रामचंद्र खंडाळे यांचा शहर भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडून सत्कार*
नेवासा प्रतिनिधी
*नेवासा भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते रामचंद्रजी खंडाळे सर यांची महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या भाजपा महाराष्ट्र राज्य परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भाजपा नेवासा शहर कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, प्रदेश सचिव निरंजन डहाळे, भाजप माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे, जेष्ठ नेते ॲड संजीव शिंदे, लक्ष्मणराव मोहिते यांनी त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेत ही नियुक्ती झाल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल नेवासा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याला सार्थ अभिमान वाटत आहे.
चौकट
रामचंद्र खंडाळे यांच्या भाजप राज्य परिषदेवर निवडीचा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान व गौरवास्पद बाब..... भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे
सत्कार समारंभ प्रसंगी देवगाव सोसायटीचे चेअरमन कुंदनशेठ भंडारी, राजेश कडु, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिवआदिनाथ पटारे, ॲड. ज्ञानेश्वर विधाटे, भाजप व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मुथा, ॲड. गोविंद जगताप, शिवाजी लष्करे, ऋषिकेश शहाणे, लक्ष्मण मोहीटे, चांगदेव दारुंटे, मानव साळवे, आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित रामचंद्र खंडाळे सर यांना शाल श्रीफळ फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन तालुक्याच्या वतीने सन्मानित करण्यात आली होते.*