मा.खा. सुजय विखे यांची नेवास शहर भाजपा कार्यालयास भेट.
नेवासा प्रतिनिधी
दि. 2 जुलैरोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मा.खासदार सुजय दादा विखे पाटील हे नेवासा दौरा असताना यांनी नेवासा शहरातील ठाणगे कॉम्प्लेक्स मध्ये असलेले भाजपा शहरअध्यक्ष मनोज पारखे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली व कार्यालयामार्फत सुरू असलेल्या जनसेवेची माहिती घेतली.
नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी लोणीहून शिरसगाव कडे जात असताना नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भाजपा युवा नेते मनोज पारखे व त्यांच्या सहकार्यांनी त्यांचे स्वागत करुन गणपतीचे दर्शन घेतले यावेळी उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी सुजय दादांचे जल्लोषात सत्कार केला विखे यांनीही युवकांना वेळ देत सर्वांशी संवाद साधला. यानंतर भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे व निरंजन डहाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सुजय दादांनी भेट दिली यावेळी मनोजआण्णा पारखे यांनी कार्यालयामार्फत करत असलेल्या जनसेवेची माहिती त्यांना दिली. त्याचबरोबर नेवासा शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न वअडचणी बद्दल आढावा घेतला. नेवासा शहरातील अनेक दिवसांपासून शॉपिंग कॉम्प्लेक्स वाटपाचा प्रलंबित प्रश्न व आणि पाणी प्रश्न या आणि विविध प्रश्नावर भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी खासदार सुजय दादा विखे यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर नुकतीच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेवर सचिव पदी निवड झाल्याबद्दल आदिनाथ पटारे यांचा सन्मान सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
चौकट
नेवासा शहरातील विविध प्रलंबित प्रश्नाविषयी घेतला कार्यकर्त्यातून आढावा
त्याप्रसंगी समर्पण फाउंडेशनचे डॉ. करण सिंग घुले यांनी कृषी परिषदेमार्फत जायकवाडी धरणाच्या पाणी वापर अधिकृत कार्य क्षेत्र वाढवण्याची मागणी केली. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल त्यासाठी मा. खासदार साहेबांनी हे सर्व प्रश्न मी स्वतः पाठपुरावा करून मार्गी लागेल असे उपस्थित त्यांना आश्वासन दिले.यावेळी भाजपाचे राजेश कडू पाटील, शिवाजी लष्करे, महेश पारखे, अशोक मारकळी, आकाश कुसळकर, रामदास लष्करे, ऋषिकेश शहाणे, डॉ. बाळासाहेब कोलते, भाजप प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे,रोहित कोकाटे, गोविंद कदम, गणेश गाढवे, श्रीराम लष्करे माऊली जाधव, अशोक टेकने, ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब दारुंटे, किरण दारुंटे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.