"पोलीस पाटील संघटनेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; निवृत्तीवय वाढविण्यासाठी शासनस्तरावर निर्णय लवकरच – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही"
मुंबई, दि. ०१ जुलै :
दिनांक ०१ जुलै २०२५ हा दिवस पोलीस पाटील वर्गाच्या दृष्टीने इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, असा महत्त्वाचा ठरला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव कोलते पाटील यांनी पोलीस पाटील वर्गाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात सर्वात महत्त्वाची अशी पोलीस पाटलांचे निवृत्ती वय ६० वरून ६५ वर्ष करण्याची मागणी करण्यात आली. यावर मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, "या मागणीवर लवकरच शासनस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल," असे स्पष्ट शब्दांत सांगत या मागणीस न्याय दिला.
तसेच, याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांची भेट घेण्यात आली. या भेटीत पोलीस पाटलांसाठी आरोग्य कवच योजना लागू करण्यात येईल, अशी १००% हमी आरोग्य मंत्र्यांनी दिली, हे विशेष उल्लेखनीय.
या ऐतिहासिक प्रसंगी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बळवंतराव काळे, संस्थापक सचिव कमलाकर मांगले पाटील, सहसचिव डी.एस. कांबळे, संस्थापक सदस्य श्री. संतोष पवार व श्री. दिनेश पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. गणेश धेणे पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. अशोकजी म्हात्रे पाटील, श्री. उबाळे पाटील, तसेच महिला आघाडीच्या प्रमुख रणपिसे मॅडम उपस्थित होत्या.