लाख कॅनॉल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करा... ॲड.सादीक शिलेदार


लाख कॅनॉल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करा... ॲड.सादीक शिलेदार 

नेवासा प्रतिनिधी. नेवासा तालुक्याच्या उत्तरेत असणारी नेवासा बुद्रुक, साईनाथ नगर, पाचेगाव व पुनतगाव या गावातील नागरिक संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत.या गावांत रोजगाराचे इतर साधन उपलब्ध नाहीत.कमी पर्जन्यमान असल्याने ही गावे दुष्काळी पट्टयात आहेत त्यामुळे सिंचनासाठी अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या लाख कॅनॉल च्या दुरुस्ती चे काम लवकरात लवकर सुरू करा. अशी मागणी आम आदमी पार्टी नेवासा तालुक्याचे अध्यक्ष ॲड.सादीक शिलेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पा . यांना निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सन १८६७ साली लाख गावाजवळ दगडी बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याची साठवण क्षमता २५ दलघफु असून वहन क्षमता ८० क्युसेस आहे. लाख बंधाऱ्याची लांबी ३९३ मी.तर उंची ४.७५ मी. आहे. सिंचन क्षमता ६६०० हेक्टर आहे. बंधाऱ्याच्या डाव्या तीरावर ३७ किलोमीटर लांबीचा कालवा काढून त्या कालव्याने श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव, मालुंजा ,वांगी ,खिर्डी या गावांना तसेच नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पूनतगाव, नेवासा बुद्रुक,साईनाथ नगर, टोका इत्यादी गावातील शेतीसाठी खरीप व रब्बी हंगामामध्ये पुरवठा करण्यात आली येत होता. वर्षानुवर्ष सदर कालव्यातील गाळ न काढल्यामुळे व कालव्यावर झालेले अतिक्रमणे यामुळे सदरचा कालवा पूर्णपणे भरून काही ठिकाणी दिसेनासा झाला आहे. या भागात पर्जन्यमान १०० ते १५० मिमी आहे. त्यामुळे नेहमी दुष्काळी परिस्थिती ओढवते. या कालव्याचे काम पूर्ण झाल्यास पाचेगाव व पुन गाव हे दोन्ही गावे मिळून १७९० हेक्टर त्याचप्रमाणे नेवासा बुद्रुक,साईनाथ नगर ते टोका यादरम्यान १९७० हेक्टर असे नेवासा तालुक्यातील एकूण ३७६२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास भूजल साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल व त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटेल. शेतीसाठी मिळणाऱ्या पाण्यात वाढवून शेती पूरक व्यवसाय जसे पशुपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी व्यवसायात वाढ होऊन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे या भागात आर्थिक संपन्नता येऊन हा भाग सुजलाम सुफलाम होईल. लाख कालव्याच्या दुरुस्तीस मंजुरी देऊन काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास यासाठी या गावातील लाभधारक शेतकरी यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.