प्रहार चे बच्चुभाऊ शेतकऱ्यांसाठी गुरुवारी नेवासा येथे हुंकार सभा* -



*प्रहार चे बच्चुभाऊ शेतकऱ्यांसाठी गुरुवारी नेवासा येथे हुंकार सभा* -


नेवासा प्रतिनिधी. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांनी विधानसभेच्या बाहेर शेतकरी व दिव्यांगणा न्याय मिळण्यासाठी छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथून आंदोलनाचा शड्डू ठोकून प्रारंभ केला आहे. शेतकरी आणि दिव्यांग यांच्या मागण्या रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण टीमला कार्यरत करून छत्रपती शिवरायांचे विश्वासू मावळे संताजी धनाजी पुरस्कार देऊन पुन्हा कार्य केले आहे राजकारणात पराभव थांबू शकत नाही लढण्याची धमक लागते असं सांगत महाराष्ट्र पिंजून काढलाय या शेतकऱ्यांची धडाडणारी तोफ प्रहार जनशक्ती पक्षाची संस्थापक बच्चुभाऊ यांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका गळनिंब येथे सभेचा हुं कार करण्याचे ठरवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातबारा कोरा व हातबल झालेला शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभेचे आयोजन नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे गुरुवार दिनांक 24 सायंकाळी 7:30 वाजता केलेले आहे या सभेसाठी जास्तीत जास्त शेतकरी दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान आहिल्या नगर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष एडवोकेट पांडुरंग औताडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, संघटक जालिंदर आरगडे, शेतकरी आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, मधुकर शिंदे, तालुकाप्रमुख अनिल विधाटे, युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे, अरविंद आरगडे, पांडुरंग नवले राजेंद्र कळस्कर आदिनाथ कडू, दिलीपराव मते व गळनिंब ग्रामस्थांच्या वतीने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.