🔥 नेवासा तालुक्यातील जळके . ग्रामपंचायतीत सत्तासंघर्ष शिगेला! सरपंचाविरोधात 10 सदस्यांचा अविश्वास प्रस्ताव – विशेष सभा आज दुपारी 🔥
नेवासा तालुक्यातील जळके खुर्द ग्रामपंचायतीत सत्तासंघर्षाला नवे वळण लागले असून, सरपंच श्री. राजेंद्र बहिरनाथ पंडित यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे. हा ठराव सौ. कल्पना बाळासाहेब शिंदे यांच्यासह इतर 9 सदस्यांनी दिनांक 16 जुलै 2025 रोजी दाखल केला आहे.
यासंदर्भात नेवासा तहसिलदार कार्यालयाकडून अधिकृत नोटीस बजावण्यात आली असून, गुरुवार, दिनांक 24 जुलै 2025 रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालय, जळके येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार असून त्यानंतर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अविश्वास प्रस्तावावर सही करणाऱ्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे:
सौ. कल्पना बाळासाहेब शिंदे
श्री. विठ्ठल कपूरचंद परदेशी
श्री. दत्तात्रय नरसिंग चावरे
सौ. आशा बाळासाहेब शिंदे
सौ. शीतल बाळासाहेब गोरे
सौ. कुसुमबाई पोपट गोरे
श्री. दादासाहेब रघुनाथ चिमणे
श्री. आसिफ नसीर पठाण
सौ. संजीवनी सुनील वाघमारे
श्रीमती शबाना निसार पठाण
तहसिलदार डॉ. संजय बिरादार यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या नोटीसीनुसार, सभेस उपस्थित राहणे बंधनकारक असून, प्रकल्प बुक, इतिवृत्त नोंदवही, आणि प्रस्तावाच्या प्रती सह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळाची शक्यता नाकारता येत नाही.
ही सभा ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलणार का? की पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व टिकून राहणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.