नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप — मराठा सुकाना समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला
नेवासा (प्रतिनिधी गणेश झगरे) – नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने कपड्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या वेळी गणेशभाऊ झगरे यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले असून, हे वाटप माझ्या हस्ते करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी शाळेतील शिक्षक वर्गांचे आभार मानतो. मुख्याध्यापक सुभाष चव्हाण सर उत्कृष्ट प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. ग्रामपंचायतीचाही शाळेला उत्तम सहकार्य लाभत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.”
या कार्यक्रमाला तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे, पोलीस पाटील अनिल लहारे, मुख्याध्यापक सुभाष चव्हाण, शिवसेना (शिंदे गट) चे मनोज झगरे, देवदान साळवे, उपसरपंच अविनाश साळवे, अनिल गोरे, श्रीमती जगदाळे मॅडम, संगीता झगरे, अलका कांगणे, जाईल साळवे, दहावीत साळवे, अनिल साळवे, सचिन गायकवाड, आजिनाथ सदाशिव झगरे, ग्रामसेवक दत्तात्रय गरजे, तन्मय पांडागळे, गोरक्षनाथ नवघरे, शकूर इनामदार, अंजली सोनवणे यांच्यासह मक्तापूर येथील ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुस्थितीत पार पडले असून, विद्यार्थी व पालकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.