*कारवाईसाठी नेवासा शहर काँग्रेसचा अहिल्यानगर उपनिबंधक यांना आंदोलनाचा इशारा*
(नेवासा प्रतिनिधी )- नेवासा तालुक्यातील निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक यांनी जमीन खरेदी विक्री व्यवहारात केलेल्या घोटाळ्याची चौकशी व कारवाई करण्याची मागणी नेवासा शहर काँग्रेसकडून करण्यात आली.ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
नेवासा तालुक्यातील दुय्यम निबंधक पवार यांनी मागील वर्षभरात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघण करून नागरिकांकडून लाज घेऊन अनेक खरेदी विक्रीचे बेकायदेशीर व्यवहार केले. सरकारी जमिनीचे मूल्यांकन कमी दाखवून बेकायदेशीर व्यवव्हार करत लाखोंचा महसूल बुडवीला. तर पवार याने सरकारी फी व्यतिरिक्त प्रत्येक व्यवहारासाठी नागरिकांनाकडून अतिरिक्त पैशाची मागणी करत भ्रष्टमार्गाने पैसा उकळत अमर्यादित संपत्ती जमविली.
तर वसुलीसाठी कुटुंबातील आपल्या मुलाची नियुक्ती करून परस्पर माया जमविण्याचा प्रताप पवार याने केला आहे.यापलीकडे पवार याने तालुक्यातील एका गट नंबरला न्यायालयीन स्टे असताना सुद्धा जास्त लाज घेऊन दुसऱ्या निबंधक कार्यालयात खरेदी करण्याचा सल्ला देऊन खरेदी करून दाखविली. असे अनेक बेकायदेशीर काम या दुय्यम निबंधक यांनी केले. या सर्व बाबींची दखल घेत नेवासा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अंजुम पटेल यांनी अहिल्यानगर येथील उपनिबंधक यांची भेट घेत दुय्यम निबंधक पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात उपनिबंधक यांच्याकडे पुरावे देखील सादर केले आहे.निवेदनावेळी प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान शेख,बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण आदी उपस्थित होते.
*चौकट* - नेवासा तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयात अनागोंदी कारभार असून मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. याला जबाबदार दुय्यम निबंधक पवार हेच आहे. पवार यांच्यावर तातडीने निलंबणाची कारवाई होणे गरजेचे आहे - : अंजुम पटेल- शहराध्यक्ष नेवासा शहर काँग्रेस