*आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाकडून वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा धामोरी येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप*


*आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाकडून वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा धामोरी येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप*

नेवासा प्रतिनिधी 
*आज बेलपिंपळगाव गटातील धामोरी येथे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल राव लंघे पाटील यांच्या उद्या होणाऱ्या अभिष्टचिंतन वाढदिवस सोहळ्यानिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ धामोरी यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक धामोरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही ,पेन खाऊ व नाश्त्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत आमदार विठ्ठलराव लंघे यांचे बंधू श्री सुनील बापू लंघे पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनील बापू लंघे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धामोरी या गावाने आमदार साहेबांना कायमच विशेष प्रेम दिलेले आहे. त्यामुळे आपले सुंदर छोटेसे गाव विकास कामापासून कधीही वंचित राहणार नाही याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली आलेल्या मान्यवरांचा सत्कार धामोरी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील दिलीप पटारे मा.सरपंच मोतीराम हेलवडे मा ग्रामपंचायत सदस्य पोपटराव वरखडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला, याप्रसंगी चेअरमन नवनाथ पटारे ,मा. चेअरमन यादव पटारे, युवा कार्यकर्तेआदिनाथ पटारे, आकाश पटारे, अजित पटारे, प्रगतिशील शेतकरी बन्सी पठाडे, रमेश घोरपडे,कडूबाल पटारे, झुंबर दाणे, रघुनाथ पटारे, मच्छिंद्र आसणे, बबन पटारे.शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा हळगावकर व सूत्रसंचालन वर्गशिक्षक नवनाथ राहींज यांनी केले याप्रसंगी धामोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या शेवटी आदिनाथ पटारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.