नेवासा फाटा, मुकिंदपूर येथे 'मातोश्री मोबाईल शॉप अँड पान स्टॉल' व 'राजमुद्रा बिर्याणी हाऊस अँड खानावळ' चे भव्य उद्घाटन संपन्न
मुकिंदपूर (प्रतिनिधी) – नेवासा फाटा, मुकिंदपूर येथे मातोश्री मोबाईल शॉप अँड पान स्टॉल तसेच राजमुद्रा बिर्याणी हाऊस अँड खानावळ या दोन नव्या व्यवसायांचे भव्य उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. या व्यवसायांची संकल्पना मातोश्री मोबाईल समूहाचे उद्योजक अनिल परदेशी तसेच राजमुद्रा बिर्याणी हाऊस अँड खानावळचे उद्योजक अवधूत मीरकुटे आणि मनोज मुंजाळ यांची आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मुकिंदपूरचे मा. लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे तसेच काठीवाले बाबा उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते या दोन्ही दुकानांचे उद्घाटन पार पडले.
तसेचअनिल परदेशी यांचे आई-वडील यांच्या हस्ते 'मातोश्री मोबाईल शॉप अँड पान स्टॉल' चे उद्घाटन करण्यात आले. आपल्या आशीर्वादातून त्यांनी व प्रमुख मान्यवरांनी या नव्या उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी विजू गायके, इरफान शेख, रमेश जाधव, बर्डे मेजर अच्छू जगताप, अरविंद बोरुडे, मारुती दिघे, अमोल महानोर, कपिल बांगर, किशोर पेरे, कैलास अण्णा निपुंगे, प्रशांत निपुंगे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या उद्योगांमुळे मुकिंदपूर व परिसरातील आपल्या सोयीनुसार सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक व्यवसायवाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.