पालकांना ‘नो एन्ट्री’? – त्रिमूर्ती शाळेचे अतिरेकी नियम विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच शिक्षा देत आहेत!l

 


पालकांना ‘नो एन्ट्री’? – त्रिमूर्ती शाळेचे अतिरेकी नियम विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच शिक्षा देत आहेत!

नेवासा प्रतिनिधी

त्रिमूर्ती शैक्षणिक शाळा, जी एके काळी शिस्त आणि गुणवत्ता यासाठी ओळखली जात होती, ती आता अतिरेकी नियमांमुळे पालकांच्या रोषाला सामोरी जात आहे. शाळेने नुकताच एक असा फर्मान काढला आहे की, बाहेरील विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या आवारात गाडी घेऊन येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे – अगदी आपल्या पाल्याला सोडण्यासाठी देखील!

शाळेच्या या निर्णयामुळे सकाळी आणि दुपारी शाळेसमोर अफाट गर्दी उसळते. अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात धावणारे विद्यार्थी, आणि चिंताग्रस्त पालक – हे चित्र आता नेहमीचंच झालं आहे. नियमांचा उद्देश शिस्त राखण्याचा असला, तरी पालकांच्या मते हे नियम अव्यवहारी आणि अकारण त्रासदायक आहेत.

“शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर असावं, तुरुंग नव्हे!” – एका पालकाचा संताप

“आम्ही आमच्या लहानग्या मुलांना सोडण्यासाठी शाळेपर्यंत येतो, त्यात गाडी थोडी आत नेली तर काय बिघडतं? शाळेच्या कर्मचाऱ्यांचा वॉर्डनसारखा वागणं सुरू आहे,” 

शाळेच्या प्रशासनाने मात्र हा निर्णय वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी घेतल्याचं सांगितलं आहे. परंतु रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अजूनच गोंधळ वाढला आहे. काही पालकांनी या धोरणाविरोधात लेखी तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.

हा शिस्तीचा आग्रह, की अतिरेकी वागणूक?

पालकांच्या मते, शाळेने व्यवहार्य पर्याय द्यायला हवेत – जसे की वेगळं ‘ड्रॉप ऑफ’ झोन, वेळेचे स्लॉट, किंवा गार्डच्या सहकार्याने नियोजन. पण सध्या दिसतंय ते म्हणजे कठोरता, संवादाचा अभाव आणि पालकांचा अपमान.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नियम समजू शकतात, पण पालकांनाही शाळेचा भाग समजून घेणं प्रशासनाच्या हातात आहे. शिक्षणसंस्थांमध्ये शिस्त आणि संवाद यांचा समतोल हवा, अन्यथा अशा आक्रमक नियमांमुळे शिक्षणाचा उद्देशच हरवेल.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.