श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी वर्ष १ले – ३१व्या माऊली दिंडीचा भव्य स्वागत सोहळा पांढरी पुल येथे पार


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी वर्ष १ले – ३१व्या माऊली दिंडीचा भव्य स्वागत सोहळा पांढरी पुल येथे पार

पंढरपूरच्या वाटचालीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी वर्ष १ले यांची ३१वी माऊली दिंडी पांढरीच्या पुलाजवळ पोहचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याचे आयोजन मा. रविराज तुकाराम पाटील गडाख (युवा नेते) यांच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने आणि भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी खास खिचडीचा महाप्रसाद, झिरक्याचे व आवळ्याच्या अर्काचा आयुर्वेदिक चहा देण्यात आला.

या वेळी सहा जे.सी.बी.च्या माध्यमातून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून दिंडीचा स्वागत सोहळा अधिक भव्य करण्यात आला. सर्व नियोजन आदर्श परिवार यांच्यातर्फे सुयोग्य प्रकारे व नेटकेपणाने पार पाडले गेले. स्वागत सोहळ्याचे संपूर्ण संयोजन मा. रविराज गडाख पाटील व सौ. जयश्रीताई रविराज गडाख पाटील, तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराने अत्यंत सुंदर पद्धतीने केले.

या भाविकतेने ओथंबलेल्या स्वागत सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये श्री खेसमाळसकर सर, श्री कल्हापुरे सर, श्री फोपसे सर, श्री दराडे सर, श्री शिंदे सर, श्री प्रशांत गडाख सर, श्री अनिल दरंदले सर, श्री शेंडे सर, कर्जुले सर, डमाळे सर यांचा मोलाचा सहभाग होता.

या निमित्ताने पांढरीच्या वाटचालीतील हा सोहळा सर्व वारकऱ्यांसाठी संस्मरणीय ठरला असून, अशा भक्तिभावपूर्ण आयोजनातून सामाजिक एकात्मता व वारकरी संप्रदायाची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.