*गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य*
*प्रथम राज्यस्तरीय आढावा बैठक – संघटनेच्या ऐतिहासिक वाटचालीचा नवा अध्याय*
*स्थान: दत्त नगरी, श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (अहमदनगर)*
*दि. 20 जून 2025:*
_गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांची प्रथम राज्यस्तरीय आढावा बैठक देवगड येथील पवित्र दत्त संस्थानात सन्माननीय *राज्य अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव कोलते पाटील* यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडली._
_कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ही बैठक संघटनेच्या स्थापनेनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक असल्याने, राज्यभरातून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा मांडला. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून जनहितासाठी करण्यात आलेल्या कार्याचा ठळक उल्लेख केला आणि भासणाऱ्या अडचणी व राज्य संघटनेकडून असलेल्या अपेक्षाही प्रामाणिकपणे मांडल्या._
*उपस्थित जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी:*
1. भंडारा – श्री सुधाकर साठवने
2. नागपूर – श्री रितेश दुरुगकर
3. गोंदिया – श्री राजेश बन्सोड
4. चंद्रपूर – श्री योगेश मते
5. गडचिरोली – श्री योगेश नाकाडे
6. यवतमाळ – श्री रविशंकर ढोले पाटील
7. बुलढाणा – श्री राजेंद्र भामद्रे पाटील
8. अहिल्यानगर – श्री अशोक थेटे
9. नाशिक – श्री अरुण बोडके पाटील
10. ठाणे – श्री अशोक महात्रे पाटील
11. रत्नागिरी – श्री विश्वनाथ पाटील
12. सिंधुदुर्ग – श्री उदय सावंत पाटील
13. रायगड – श्री गणेश ढेणे पाटील
14. धुळे – श्री अतुल भामरे पाटील
15. जळगाव – श्री दीपक चौधरी पाटील
16. नंदूरबार – श्री पुरुषोत्तम पाटील, श्री राजेंद्र गिरी गोस्वामी
17. जालना – श्री इलियास बागवान पाटील
18. लातूर – श्री संभाजी भीषे
19. पुणे – श्री भारत मार्कंड, श्री नितीन टाव्हरे
20. कोल्हापूर – श्री अजीतसिंह खोत, श्री उद्धव पोतदार
21. संभाजीनगर – श्री बळेराम नाकदे
_सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या कामाचा आढावा सादर करताना विविध अडचणी, प्रशासनिक अनुभव, व योजनांची माहिती दिली. या सर्वांवर मा. श्री शिवाजीराव कोलते पाटील, मा. श्री बळवंतराव काळे, मा. श्री कमलाकर मांगले (संस्थापक सचिव), श्री जब्बार पठाण (उपाध्यक्ष) व श्री अरुण बोडके पाटील (उपाध्यक्ष) यांनी समर्पक मार्गदर्शन केले._
*संघटनेचे स्पष्ट ध्येय-धोरण व कार्यपद्धतीची माहिती*
- सर्व आर्थिक व्यवहार फक्त बँक खात्याद्वारे पार पाडण्याचा निर्णय
- दरवर्षी संघटनेचे लेखापरीक्षण (ऑडिट) करून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला प्रत उपलब्ध करून देणे
- वर्षातून किमान दोन राज्य कार्यकारिणी बैठकांचे आयोजन
- संघटनेच्या पारदर्शक आणि उत्तरदायी नेतृत्वाची पुनःप्रतीती
*नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व सनदपत्र वितरण:*
➡ राज्य कार्यकारी अध्यक्ष – श्री बळवंतराव काळे पाटील
➡ राज्य उपाध्यक्ष – श्री अरुण बोडके पाटील, श्री जब्बार पठाण
➡ राज्य सचिव – श्री महादेव भालेराव
➡ राज्य खजिनदार – श्री विश्वनाथ पाटील
➡ राज्य सहसचिव – श्री डी.एस. कांबळे, श्री गोरख टेंभकर
➡ राज्य संघटक – श्री नवनाथ धुमाळ
➡ नागपूर विभागीय अध्यक्ष – श्री विजय घाडगे पाटील
_वरील सर्व मान्यवरांना मा. शिवाजीराव कोलते पाटील यांच्या हस्ते सनदपत्र देऊन सन्मानपूर्वक पदभार देण्यात आला.._
_कार्यक्रमास श्री संतोष पवार पाटील, सौ. दीपमाला पाटील, सौ. नंदा ठाकरे, श्री दिनेश वांद्रे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते._
_कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री राजेंद्र भामद्रे पाटील (बुलढाणा जिल्हाध्यक्ष) यांनी केले, सूत्रसंचालन श्री जब्बार पठाण यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री अशोक थेटे पाटील यांनी केले.._
*ही बैठक केवळ आढावा बैठक न राहता, संघटनेच्या कार्याची दिशा निश्चित करणारी, पारदर्शकतेची हमी देणारी आणि सर्व जिल्ह्यांना एका सूत्रात बांधणारी ऐतिहासिक घडामोड ठरली.*
*यापुढे संघटना अधिक बळकट, सक्रिय व लोकाभिमुख व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभर उत्साही पाटील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत..*
*संघटना बळकट व्हावी, पाटील बांधवांना न्याय मिळावा, आणि गावपातळीवर विकास व कायदा-सुव्यवस्थेचे बळ वाढावे – हाच या बैठकीचा खरा उद्देश होता आणि आहे..*
यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे प्रथम राज्य अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळणारे शहापूर,ता. नेवासा येथील पोलीस पाटील व श्री.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.शिवाजीराव कोलते पाटील,तसेच महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना स्थापन करण्याचा सिंहाचा वाटा असणारे नेवासा तालुक्यातील निंभारी गावचे पोलीस पाटील श्री.संतोषपाटील पवार,मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माळेवाडी खालसा पोलीस पाटील श्री.बाळासाहेब पाटील,आहील्यानगर जिल्ह्याचे सचिव आदेश साठे पाटील,सुभाष भांगे पाटील,संदीप लहारे पाटील,महेंद्र बिडगर पाटील,चंद्रकांत उंदरे पाटील,गणेश सोमुसे पाटील,बाळासाहेब साळुंके पाटील,शिवाजी घोडेचोर पाटील,एकनाथ कोतकर पाटील,आप्पासाहेब गर्जे पाटिल,प्रल्हाद विधाटे पाटील,ताराचंद बनकर पाटील,बाबासाहेब कानडे पाटील,सखाराम शिंदे पाटील,संजय तुपे तसेच मिनाक्षी रिंधे पाटील,स्वाती घोरपडे पाटील,मंगल सावंत पाटील,एड.स्मिता लवांडे पाटील,एड.अंजली काळे पाटील,आदी नेवासा तालुक्यातील व आहील्यानगर जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.