परायण ज्ञानेश्वर महाराज हजारे व भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पिचडगाव दिंडीचे नेवासा फाटा येथे उत्साही स्वागत
नेवासा, दि. २२ जून – पिचडगाव (ता. नेवासा) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या सोळाव्या माऊली आश्रम दिंडीचे नेवासा फाटा येथे उत्साही स्वागत करण्यात आले. या दिंडीचे मार्गदर्शन परायण हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज हजारे करीत असून, याला गुरुवर्य भास्करगिरी महाराज व महंत सुनीलगिरी महाराज यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
नेवासा फाटा येथे नित्यसेवा हॉस्पिटल यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळ व पाण्याच्या बाटल्या वाटपाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते महाराजांना फळांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. महेंद्र शेलार, डॉ. विजयकुमार आवारे, डॉ. वृषाली आवारे, कविता आनंद साळवे, तसेच डॉ. रोहित गहिरे, डॉ. अजय काळे, घनशाम आवारे यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी पिचडगावचे सरपंच पोपटराव हजारे, भगवंतराव शेजुळे, शिवसेना नेते गणेश झगरे, सागर सरोदे, सरपंच अनिल लहारे, ज्ञानेश्वर अवताडे, वैभव शेजुळे, अमोल सातपुते, जोएल साळवे (केक शॉपी मालक), उपसरपंच शेषराव बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताभाऊ कांगोणे, निवृत्ती हजारे, सायकलचे मालक साहेबराव निपुंगे, हरिभाऊ कोळेकर, यांच्यासह महिला व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थितांनी दिंडीतील भक्तांना शुभेच्छा देत, अशा पवित्र यात्रेत सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला. नित्यसेवा हॉस्पिटलच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
--