म्हसले ते मक्तापूर रस्त्याच्या कामाला शुभारंभ गणेश झगरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; महाराष्ट्र न्यूज प्रिन्सच्या सातत्यपूर्ण प्रसिद्धीमुळे
नेवासा प्रतिनिधी: शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हसले ते मक्तापूर रस्त्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम अखेर सुरु झाले असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या रस्त्यासाठी गणेश झगरे यांनी गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने मागणी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन रस्त्याच्या कामासाठी मागणी केली होती. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार शंकरराव गडाख, आमदार विठ्ठल लंघे तसेच माजी बाळासाहेब मुरकुटे यांचे सहकार्य लाभले.
रस्त्याच्या कामासाठी एकूण ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाला मंजुरी देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नामदार शंकरराव गडाख यांची विशेष भूमिका राहिली.
ग्रामस्थांनी शिवसेनेचे व स्थानिक नेतृत्वाचे आभार मानत गणेश झगरे यांचा सत्कारही केला. महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या माध्यमांनी वेळोवेळी दखल घेऊन बातम्या लावल्यामुळे आज हा रस्ता झाला आहे असे गणेश झगरे म्हणाले