कै. विनायक नारायण शिरसाठ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
नेवासाफाटा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) – समाजसेवा, साधी राहणी आणि प्रेमळ स्वभावाने आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडणारे कै. विनायक नारायण शिरसाठ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता जी. के. मंगल कार्यालय, नेवासाफाटा येथे हा कार्यक्रम होणार आहे.
सुगंधित चंदनासारखा त्यांचा जीवनप्रवास होता – कष्टाने अंग झिजवत त्यांनी वसंत फुलवला. समाजासाठी निरंतर कार्य करताना त्यांनी अनेकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्यांच्या आठवणी आजही क्षणोक्षणी मनात दरवळत आहेत.
विनायक शिरसाठ यांचा बेकरी व्यवसाय गावात प्रसिद्ध होता. त्यातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला. तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी सामाजिक भान ठेवत गावाच्या विकासासाठी महत्वाचे निर्णय घेतले. रस्ते, पाणी, स्वच्छता अशा विविध विषयांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतली होती.
या वर्षश्राद्ध निमित्ताने त्यांचे जिवलग मित्र कृष्णा भाऊ अवताडे यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग आठवले. "विनू हा नेहमीच लोकांच्या मदतीस तत्पर असायचा. कधीही कुणाची अडचण असो, तो पहिल्यांदा धावून जायचा," असे ते भावूक होत म्हणाले.
कार्यक्रमात ह.भ.प. दत्तात्रय महाराज व्यवहारे (नेवासा) यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्तन होणार आहे. त्यात विनायक शिरसाठ यांच्या जीवनमूल्यांना उजाळा देण्यात