रुरल हायस्कूल वडाळा मिशनचा ८१.२५% निकाल – नैतिक वारकड प्रथम
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील रुरल हायस्कूल वडाळा मिशन शाळेचा इयत्ता दहावीचा मार्च २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शाळेने ८१.२५ टक्के निकालाची उज्वल कामगिरी केली आहे.
या निकालात नैतिक संदीप वारकड याने ७३.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. इरफान अल्ताफ पठाण याने ६१.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. सीमा भारत गायकवाड हिने ५९.०० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
नैतिक वारकड याचे वडील संदीप वारकड हे नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये कर्मचारी असून, पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे त्यांना आपल्या मुलाच्या यशाबद्दल अभिमान आहे. ग्रामीण भागातून गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशस्वी निकालाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.