मक्तापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावातील छत्रपती चौकात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मराठा सुकाना समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गावातील दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमात मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "धर्मवीर संभाजी महाराजांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करत आपला धर्म सोडला नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतःमध्ये बदल करावा." त्यांनी युवकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करत असेही सांगितले की, "आई-वडिलांची सेवा आणि समाजहितासाठी एकत्र येऊन धर्मविरोधी प्रवृत्तींचा निषेध करावा."
कार्यक्रमाला मराठा सुकाना समितीचे पदाधिकारी व गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सभापती रावसाहेब कांगणे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ता कांगणे, पोलीस पाटील अनिल लहारे, माजी सरपंच अण्णासाहेब खैरे, उपसरपंच अविनाश साळवे, ग्रामसेवक दत्तात्रेय गरजे, तसेच बरेच शिवभक्त व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन गणेश झग रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
---