: गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पिचडगाव येथे संपन्न
पिचडगाव (ता. नेवासा) येथील हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज हजारे माऊली आश्रमाच्या पावन उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिचडगावचे चेअरमन माननीय भगवानराव शेजुळ होते. सरपंच पोपटराव हजारे, उपसरपंच शशिकांत बनसोडे, मक्तापूरगावचे पोलीस पाटील अनिल भाऊ लहारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ भाऊ हजारे, तसेच बहादूर भाई पठाण, संजय साबळे, अरुण साळवे, यश साळवे, सौ. मंदाकिनी शिरसाठ या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनामदार सर यांनी तर प्रस्ताविक कचरे सर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय कोळेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. प्रणाली साळवे, कु. कादंबरी गवळी, कु. ऋतुजा साळवे, कु. कावेरी साबळे, कु. पूजा शिरसाठ, श्रीमती मनीषा बाबासाहेब जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री. गणेश कचरे सर, श्री. कैलास कर्जुले सर, श्री. हनुमान गंधारे सर, दत्तात्रय कुळधरण सर, सौ. अंजना सोनवणे मॅडम तसेच मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, पुढील वाटचालीसाठी एक नवा आत्मविश्वास देणारा ठरला.