*संस्थाचालकाच्या अन्याय विरोधात पुकारलेल्या आमरण उपोषण आंदोलनकर्त्या शिक्षकांना मिळाले मोठे यश...*
*पुणे : कात्रज परिसरातील मुनोत प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांनी संस्थाचालकाच्या अन्याय विरोधात पुकारलेल्या आमरण उपोषण आंदोलनकर्त्या शिक्षकांना मोठे यश मिळाले आहे.*
*संस्थाचालकाने प्रशालेतील शिक्षकाना नाहक त्रास देत बेकादेशीररित्या कामावरून काढून टाकले होते. शिक्षकांनी संस्थेकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे शिक्षक व शिक्षकेतर संघटना पुणे यांच्याकडे दाद मागितली होती.*
*तसेच,शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीवर प्रशासकीय अधिकारी, पुणे मनपा यांनी नेमलेल्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीअंती संस्थेचे अनेक बेकायशीर कारनामे उघड झाले त्याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना 4 अ नुसार कारवाई ची शिफारस करण्यात आली.*
*शालेय पोषण आहार अंतर्गत केलेल्या पंचनाम्यांची व चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करून देणे, शाळा बंदचा फलक लावल्याबाबत संस्था अध्यक्ष व सचिव यांच्यावर कारवाई करावी, प्रशासकांनी कार्यभार स्वीकाराच्या दृष्टीने मा. संचालक साहेबांनी शासनाकडे पाठपुरावा करावा यासह अन्य मागण्यांवर तात्काळ कार्यवाही व्हावी म्हणून शाळेतील शिक्षकांनी मा. शिक्षण संचालक प्राथमिक/माध्यमिक कार्यालय येथे प्राणांतिक/आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणात केलेल्या मागण्यांची पूर्तता मा. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर झाल्याने उपोषणाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे तूर्तास सदर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.*
*सदर उपोषणस्थळी उपस्थित शिक्षकांना लिंबू पाणी देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. सुनीलभाऊ जगताप सर , पुणे शिक्षक व शिक्षकेतर संघटना पुणे चे अध्यक्ष श्री.हनुमंतराव चव्हाण सर आणि मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. नारायण शिंदे सर उपस्थित होते.*