माळिचिंचोरा गावाचा गौरव – 'बेस्ट एज्युकेशनल क्लासेस'चे घवघवीत यश!
संस्थेचे चालक मंडलिक सर यांच्याकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवेशाचे आवाहन
माळिचिंचोरा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील बेस्ट एज्युकेशनल क्लासेस या नामांकित संस्थेने यावर्षी पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. संस्थेचे चालक मंडलिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विद्यार्थ्यांनी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये घवघवीत यश संपादन करून गावाचा आणि संस्थेचा लौकिक वाढवला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उच्च टक्केवारी मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
सेंट मेरी स्कूल, नेवासा फाटा येथील एंजल वाघमारे हिने इयत्ता १० वी मध्ये 87.40% गुण मिळवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. घाडगे पाटील ज्युनिअर कॉलेजच्या दिपाली चिंधे हिने ११ वी सायन्स बीमध्ये फिजिक्समध्ये 90 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच संस्थेतील माया नवखंडे हिने इयत्ता १२ वी मध्ये 71.50% गुण मिळवून क्लासमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. S.D.A. स्कूल, नेवासा येथील मोहम्मद हसन देशमुख याने १० वीमध्ये 81.80% गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला, तर आरती चिंधे हिने 77.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. त्याच शाळेतील रुद्र लष्करे याने 81.60% गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला.
माळिचिंचोरा हायस्कूलचा विद्यार्थी सोहम चौधरी याने गणित विषयात 80 गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला (द्वितीय स्थान). या हायस्कूलच्या रुतुजा शिंदे हिने १००% निकालात सहभाग नोंदवला आहे. इयत्ता ९ वीतील आदिती शिंदे आणि सेजल मंडलिक या दोघींनीही माळिचिंचोरा हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करताना संस्थेचे चालक मंडलिक सर म्हणाले की, “बेस्ट एज्युकेशनल क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असते. वैयक्तिक लक्ष, नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि मूल्याधारित शिक्षण हे आमच्या यशाचे गमक आहे.”
संस्थेचे ब्रीदवाक्य "खूप शिका, मोठ्ठे व्हा, नाव कमवा!" हे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून प्रत्यक्षात उतरवले आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच संपर्क साधावा, असे आवाहन मंडलिक सर यांनी केले आहे.
संपर्क: मंडलिक सर – 9970585741 / 7517407341
बातमी सादरकर्ते: Ayush Digital – 9923330994