नेवासा मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन; भारतीय सैन्याच्या पाठिंब्यासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नेवासा, दि. २२ मे २०२५ – भारतीय सैन्याच्या "ऑपरेशन सिंदूर" मधील पराक्रमाला सलाम करत, नेवासा तालुक्यातील देशभक्त नागरिकांच्या वतीने एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली गुरुवार, २२ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री मळगंगादेवी मंदिर, नेवासा येथून सुरुवात होणार असून तिचा समारोप श्री मोहिनीराज मंदिर चौक येथे होणार आहे.
ही रॅली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या शौर्यपूर्ण कारवाईनंतर त्यांच्या मनोबलासाठी आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
आयोजकांनी सांगितले की, “ही रॅली कोणत्याही राजकीय पक्षाच्या वा संस्थेच्या वतीने नसून, केवळ देशावर प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांची एकजूट आहे.” सर्व युवक, माताभगिनी आणि देशप्रेमी नागरिकांना यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“तिरंगा आपल्या हातात असावा, आणि देशभक्ती आपल्या हृदयात,” असा संदेश देत नेवास्यात उद्या देशभक्तीचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे.
-