वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीचा गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान – उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन
वडाळा (ता. नेवासा) | दिनांक २९ मे रोजी वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सरपंच मा. ललित पांडुरंग मोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
रुरल हायस्कूलच्या चि. नैतिक संदीप वारकड (७३%) याने प्रथम क्रमांक पटकावला, तर इरफान अल्ताफ पठाण (७१%) व कु. सिमा भारत गायकवाड (६८.५०%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. किसनगिरी बाबा विद्यालय उस्थळ दुमालाच्या कु. भारती सचिन मोटे (९१%), कु. हर्षवी निलेश तिजोरे (८९%) व कु. ऐश्वर्या राजेंद्र राऊत (८७%) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. किंगडम विद्यालय, सोनई येथील चि. पृथ्वी ललित मोटे (९१%) व कु. अनुश्री संदीप मोटे (८७%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
बारावीतील कु. कार्तिकी भवार, कु. सबाखान पठाण, व कु. कल्याणी तांबे यांनी उत्तीर्ण होऊन गावाचा मान वाढवला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मा. सरपंच ललित मोटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून "आजचं यश हे उज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन चांगले अधिकारी व्हा. आई-वडिलांच्या कष्टांची जाण ठेवा आणि सोशल मीडियापासून अंतर ठेवा," असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपसरपंच सौ. रंजना सुरेश राऊत, जेष्ठ नेते भाऊसाहेब दादा मोटे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबासाहेब मोटे यांनी केले.
– प्रतिनिधी, वडाळा
संदीप वारकड