छत्रपती संभाजी महाराज जयंती नेवासा फाटा येथे उत्साहात साजरी
राजमुद्रा चौक, नेवासा फाटा (ता. नेवासा) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाला नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उठाव आला.
या कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब घुमरे ,गणपतराव मोरे, किशोर भनगे, पोलीस पाटील आदेश साठे, संजय जाधव, राम मगरे, राहुल जामदार, सुकाणू समितीचे अध्यक्ष गणेश झगरे, पत्रकार आबासाहेब शिरसाठ ,पत्रकार राजेंद्र वाघमारे ,पत्रकार बादल परदेशी ,अंजुम पटेल, संजय वाघमारे ,वसंत वांडेकर, श्री घनवट सर, पारखे साहेब, नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्मचारी राठोड साहेब, तसेच या कार्यक्रमात विविध व्यापारी व नेवासा फाटा येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रमाची रोनक वाढवली
कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
–