पिचडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीकांतदादा बनसोडे यांची बिनविरोध निवड


पिचडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीकांतदादा बनसोडे यांची बिनविरोध निवड

नेवासा प्रतिनिधी.नेवासा तालुक्यातील पिचडगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दिनांक 21 मे 2025 रोजी उपसरपंच पदाची निवड शांततेत पार पडली. या निवडीत श्रीकांतदादा बनसोडे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

या वेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उषाबाई पोपटराव हजारे, माजी उपसरपंच श्री. अशोकराव गव्हाणे, सदस्य सौ. सविता दत्तात्रय हजारे, सौ. सुमनबाई सोन्याबापू डिवरे, श्री. जगदीश बबन शेजुळ आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच, संत तुकाराम सहकारी सोसायटीचे चेअरमन भगवानराव शेजुळ, व्हाइस चेअरमन उत्तमराव डिवरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर गव्हाणे यांच्यासह हरिश्चंद्र बोरुडे, शिवाजी शेजुळ, पोपटराव डिवरे, पोपटराव हजारे, उत्तमराव बनसोडे, दिगंबर शेजुळ, अरुण बनसोडे, छबुराव गव्हाणे, भाऊसाहेब बनसोडे, रमाकांत बनसोडे, साहेबराव गव्हाणे, काशिनाथ हजारे, बहादुरभाई पठाण व दामोदर बनसोडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

नवीन उपसरपंच श्रीकांतदादा बनसोडे यांनी आपल्या निवडीबद्दल ग्रामस्थांचे आभार मानत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निःस्वार्थी सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे स्वागत करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून, गुलालाची उधळण करून व जल्लोषात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


---



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.