श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट नेवासा शाखेचे सचिन मुंडे यांची 'सिनियर एक्झिक्युटिव्ह' पदावर निवड
प्रतिनिधी – संदीप भाऊ वारकड, वडाळा बहिरोबा
नेवासा – श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट नेवासा शाखेचे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री. सचिन बाळकृष्ण मुंडे यांची 'सिनियर एक्झिक्युटिव्ह' या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली. नेवासा शाखेचे शाखाप्रमुख श्री. गणेश वायकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ही निवड श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या अहिल्यानगर हेड ऑफिसमार्फत करण्यात आली असून, श्री. मुंडे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडू भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.
निवडीप्रसंगी संस्थेचे तज्ञ संचालक श्री. अमित फिरोदिया सर, श्री. भरत दारुंटे सर, जनरल मॅनेजर श्री. अनिल कदम सर, श्री. अक्षय काळे सर आदी मान्यवरांनी निवड पत्र प्रदान करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमावेळी सर्व कर्मचारी — श्री. अभिषेक नांगरे, सौ. प्रतिभा पागिरे, सौ. वैशाली ताठे, श्री. तेजस दुशिंग तसेच प्रतिनिधी संदीप वारकड — हे उपस्थित होते. या निवडीमुळे श्री. मुंडे यांचे सहकारी आणि नेवासा शाखेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
– तालुका प्रतिनिधी
संदीप भाऊ वारकड, वडाळा बहिरोबा