त्रिवेणेश्वर देवस्थान हंडी निमगाव येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच कामगारांना मिळावा यासाठी कॅम्पचे आयोजन झाले


त्रिवेणेश्वर देवस्थान हंडी निमगाव येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच कामगारांना मिळावा यासाठी कॅम्पचे आयोजन झाले 


नेवासा फाटा (प्रतिनिधी ) नेवासा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विवेक नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. इमारत व इतर बांधकाम कामगारांना त्यांची सुरक्षा संच मिळावा व त्याना  सुरक्षा संच घेण्यासाठी कार्यालयांच्या दारात न जाता कार्यालयास व अधिकाऱ्यास कामगारांच्या सेवेत आणण्यासाठी तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली होती. जेणेकरून आमच्या नेवासा तालुक्यातील कामगारांना सुरक्षा संचासाठी त्यांचा कामाचा एक दिवस वाया जाऊ नये याकरता त्यांनी हे नियोजन केले होते. येणाऱ्या काळात एकही कामगार सुरक्षा संचापासून व भांडे संचापासून वंचित ठेवणार नाही असेही नन्नवरे बोलताना विसरले नाही. भारतीय जनता पार्टीचा कामगार मोर्चाचा प्रत्येक सदस्य कामगारांसाठी झटत राहील व बांधकाम कामगारांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून द्यायला कधी कमी पडणार नाही असं ही ते म्हणाले. विवेक नन्नवरे यांची कामगार मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन केले होते, त्यामध्ये प्रामुख्याने कामगार मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री अमोल दिघे, कामगार मोर्चा उपाध्यक्ष श्री सागर पुंड, कामगार मोर्चा तालुका सरचिटणीस श्री प्रवीण मोरे तसेच नगरीतून आलेले सर्व अधिकारी यांनी उत्तमरीत्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.