शिरसगावच्या यात्रेत रंगला चितपट कुस्त्यांचा थरारनामवंत पैलवानांचे डावपेच आणि उत्साही जल्लोष

शिरसगावच्या यात्रेत रंगला चितपट कुस्त्यांचा थरार
नामवंत पैलवानांचे डावपेच आणि उत्साही जल्लोष

नेवासा फाटा : नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या शिरसगाव येथील जगदंबेचा यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते जंगी कुस्तीचे आखाडे आणि त्यातील चुरशीच्या लढती.

शिरसगाव येथील पुरातन आणि जागृत असलेल्या जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी यात्रा कमिटीच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात बैलगाडा शर्यत आणि पारंपरिक कुस्तीचे विशेष आकर्षण होते.

यात्रेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांतील नामवंत महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण डावपेचांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या गडगडाटात झालेल्या या कुस्त्यांनी वातावरण भारावून टाकले.

शेवटच्या निर्णायक लढतीत विजेत्या पैलवानाला आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तू पोटे, विलास लंघे, नितीन देशमुख, राजेंद्र पोटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण यात्रा उत्सव आनंदात पार पडला.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.