*श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 93808/- रुपयांचा धनादेश प्रदान*
नेवासा -
संत नागेबाबा मल्टीस्टेट नेवासा शाखेतील खातेदार शरद ताराचंद साठे यांना नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च देण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये 1500 रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला त्यासाठी या योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च 93808/- रुपयांची मदत श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट तर्फे करण्यात आली.
प्रसंगी मुकिंदपुर गावचे सरपंच दादा निपुंगे यांच्या शुभहस्ते व शाखेचे खातेदार यांच्या उपस्थित शरद ताराचंद साठे यांना वरील रक्कमेचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी नागेबाबा मल्टीस्टेट चे रिजनल ऑफिसर - यशवंत मिसाळ सर एरिया डेव्हलोपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे सर, नेवासा शाखेचे शाखाधिकारी - गणेश वायकर व सर्व कर्मचारी नागेबाबा मल्टीस्टेट नेवासा शाखेचे खातेदार व कायगावचे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते..