नेवासा (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर याठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आज ०५ एप्रिल रोजी कही हम भूल न जाये या अभियाना अंतर्गत प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांची २३२९ वी जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.सातुरे सर,पोलीस पाटील आदेश साठे,भगवान दळवी,नानासाहेब बनकर,दशरथ कांबळे,ग्रा.पं.सदस्य खंडागळे,भारतीय बौद्ध महासभेच्या अनिताताई कांबळे,वनिताताई कांबळे,अक्षय चौधरी,विकी कांबळे,साहेबराव साठे,संभाजी इंगळे आदी परिसरातील अनुयायी उपस्थित होते,या कार्यक्रमानिमित्त प्रा.सातुरे सर यांनी सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करतांना सम्राट अशोक हे तथागत बुद्धाच्या विचाराने प्रेरित झालेले प्रथम महान सम्राट होते,त्यांनी तथागतांच्या स्मृती प्रित्यर्थ देशभर ८४ हजार विहार व स्तुपांची निर्मिती केली होती,तसेच मानवतावादी,करुणामयी राजाने पशुपक्षासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था केली होती.या कार्यक्रमाचे आभार व स्वागत पोलीस पाटील आदेश साठे यांनी केले.