नेवासा फाटा येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती


नेवासा फाटा येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती

नेवासा फाटा (प्रतिनिधी) – अहिंसा, सत्य आणि प्रेमाचा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अध्यात्मिकतेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. यामध्ये जेष्ठ व्यवसायिक शांतीलाल ठोळे, मुकिंदपूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच दादा निपुंगे, पोलीस पाटील आदेश साठे, ॲड. गणेश निमसे, मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे, आनंद शिंगी, अमित मेहेर, बबलू गांधी, कमलेश ओस्तवाल, संदेश ठोळे, योगेश निमसे, गौरव शिंगी, पुनमचंद साळवे, प्रा. रविंद्र आल्हाट, अविनाश साळवे यांचा समावेश होता.

या प्रसंगी भगवान महावीरांच्या जीवनकार्यावर आधारित विचारमंच मांडण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत समाजातील शांतता, समतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थना व प्रसाद वितरणाने झाली. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत महावीर जयंती साजरी केल्याने सामंजस्याचे व एकतेचे प्रतीक निर्माण झाले.




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.