अ.भा. लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. रेड्डी यांचे निधन

अ.भा. लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. रेड्डी यांचे निधन

श्रीरामपूर(प्रतिनिधी)श्रीरामपूर अखिल भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.व्ही.जी. रेड्डी यांचे वयाच्या  वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून आपला आधारवड हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.स्वर्गीय रेड्डी यांच्यावर नांदेड येथील आपल्या गावी शोकाकुल वातावरणात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
   आपल्यातून अवेळी निघून जाण्याने समाजात कधी न भरून येणारी मोठी पोकळीक निर्माण झाली आहे. व्ही जी. रेड्डी साहेब हे उपेक्षितांचे आधारवड होते, ते केवळ मातंग समाजाचेच नव्हे तर प्रत्येक समाजातील रंजल्या गांजलेल्या अन्याय पिडीत अशा पुर्णतःउपेक्षित आणी दुर्लक्षित घटकांचे प्रेरणास्थान होते अशी श्रद्धांजली भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यांनी वाहिली
     समाजातील प्रश्न व ज्वलंत समस्या  सोडविण्यासाठी व्ही जी रेड्डी साहेबांचा सातत्याने पुढाकार होता, त्यांच्या निर्पेक्ष व परोपकारी मार्गदर्शनामुळे सामाजातील अनेक उपेक्षित,दुर्लक्षित आणी अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळाला आज त्यांच्या जाण्याने आमचे पितृ छत्र भारतीय लहुजी सेना खऱ्या अर्थाने पोरकी झाली असल्याचे भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी श्रद्धांजली अर्पित करतांना भावना व्यक्त केली.
       अ.भा. लहुजी सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण तथा सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य पद्धतीने तथा निरपेक्षवृत्तीने परिश्रम करण्याची त्यांनी मोठी शिदोरीच दिलेली असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही उपेक्षित घटकांसाठी कार्य करतच राहू हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी बोलतांना व्यक्त केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.