मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर संतोष देशमुख यांच्या खूनाचे फोटो व्हायरल झाले. यानंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या सगळ्या घडामोडींनतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.जाहिरातमंगळवारी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर अजित पवारांनी रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी धनंजय मुंडे यांचं उदाहरण देत, परावलंबी न होता स्वावलंबी बना, या प्रकरणातून धडा घ्या. कार्यकर्त्यांवर फार विसंबून राहू नका, अशा शब्दांत अजित पवारांनी कानउघडणी केल्याचं माहिती समोर आली आहे.नेत्यांसोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यासोबत पक्षाला देखील कशा प्रकारे बसते, हे मुंडे प्रकरणातून दिसून आलं, असं उदाहरण देखील अजित पवारांनी बैठकीत दिल्याचं सांगितलं जातं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या आजूबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत, याची माहिती घ्या.पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको परावलंबी न होता स्वावलंबी व्हा, असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.