इंडियन टॅलेंट ऑलिंम्पियाड तर्फे ज्ञानमाऊली शाळेच्या प्राचार्या सिस्टर क्युनीटा डिसोझा यांना उत्कृष्ट प्राचार्या म्हणून पुरस्कार जाहीर...


इंडियन टॅलेंट ऑलिंम्पियाड तर्फे ज्ञानमाऊली शाळेच्या प्राचार्या सिस्टर क्युनीटा डिसोझा यांना उत्कृष्ट प्राचार्या म्हणून पुरस्कार जाहीर... 

घोडेगाव प्रतिनिधी: 

घोडेगाव :- बुधवार दि. १९ मार्च २०२५ रोजी इंडियन टॅलेंट ऑलिंम्पियाड तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध नामवंत पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये बेस्ट प्रिन्सिपल म्हणून ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल, घोडेगाव शाळेच्या प्राचार्या सिस्टर क्युनीटा डिसोझा यांना २०२४-२०२५ चा उत्कृष्ट प्राचार्या म्हणून सन्माननीय किरण बेदी (या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी) सन्माननीय सायना नेहवाल (२००८ मध्ये जागतिक जुनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली) यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सन्मान मुंबई येथे सिस्टर क्युनीटा डिसोझा यांना हा देण्यात आला. यांना हा पुरस्कार जाहीर होताच ज्ञानमाऊली स्कूल व ख्रिस्त राजा चर्च, घोडेगाव मध्ये मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इंडियन ऑलिंम्पियाडून प्राचार्या सिस्टर क्युनीटा डिसोझा यांना विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, व्यावसायिकता, संशोधन नवकल्पना आणि शाळेतील व्यवस्थापन इत्यादी सेवांची गुणवत्ता आणि योगदान या निकषाच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. सिस्टरांचे समर्पण आणि नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी आहे आणि हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल, नेतृत्व आणि वचनबद्धता कष्ट यामुळे मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे विशेष असे अभिनंदन होत आहे त्यांना शाळेतून सिस्टर निलमनी शाळेच्या सेक्रेटरी, सिस्टर रफिला, सि. अनुषा, पिटर बारगळ सर स्टाफ सेक्रेटरी, नवनाथ शिंदे सर मार्गदर्शक, मारिया खरात मॅडम कल्चरल कमिटी इंन्चार्ज, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सिस्टरांचा शाळेतर्फे यथोचित असा सन्मान केला व शुभेच्छा दिल्या...
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.