मक्तापूर येथे शिवसेना (ठाकरे गट) व जय श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे शिवसेना (ठाकरे गट) व जय श्रीराम मित्र मंडळ मक्तापूर यांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती चौकात आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला युवा नेते उदयन दादा गडाख, नेवासाचे सभापती रावसाहेब पाटील कांगणे, शिवसेनेचे नेते गणेश झगरे, पोलीस पाटील अनिल लहारे आणि तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये उदयन गडाख, सभापती रावसाहेब पाटील कांगणे, मराठा सुकानात समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय कांगणे, सरपंच पोलीस पाटील अनिल लहारे, मल्हार सेनेचे व भाजपचे उपाध्यक्ष अशोकराव कोळेकर, मनोज झगरे, योगेश जामदार, मच्छिंद्र पांडागळे, अंबादास कांगणे, रामदास कांगणे, ज्ञानेश्वर लक्ष्मण बर्डे, संदीप बर्डे, प्रदीप साळवे, माजी सरपंच अण्णासाहेब खैरे, तुकाराम पाटील बर्डे, संभाजी पोपटराव बर्डे, माऊली देवकाते, राहुल जामदार, दीपक बर्डे, दीपक शिंदे, आजिनाथ झगरे, अॅड. सचिन कोळेकर, उपसरपंच अविनाश साळवे, ग्रामसेवक दत्तात्रेय गरजे, तन्मय पांडागळे, सुरेश खैरे, सुनील गोरे, अनिल देवदान साळवे, अमोल भागवत, वंचितचे योगेश गायकवाड, सचिन गायकवाड, छबुराव बर्डे, सुरेश बर्डे आदींसह मक्तापूर ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभापती रावसाहेब पाटील कांगणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. त्याच धर्तीवर मक्तापूर गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती पदावर असताना गावात अनेक रस्ते, घरकुल योजना तसेच शाळेसाठी १० लाख रुपयांचा निधी माजी मंत्री शंकरराव पाटील गडाख व सुनील भाऊ गडाख यांच्या माध्यमातून मंजूर करून आणल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा सुकानात समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाज व मराठा समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली होती.
तसेच गणेश झगरे यांनी मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे अशी मागणी करत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि कायदा लवकरात लवकर आरोपीला पकडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.