सुरज परदेशी यांच्या शौर्याला सलाम! प्रसिद्ध अभिनेत्री पायल माने यांचे कौतुक
अहमदपूर (लातूर) येथील रंग उत्सव कार्यक्रमाचे आयोजक रितेश रेड्डी यांच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नेवासा नेवासा तालुक्याचे के पी बॉडीगार्ड बाउन्सर टीमचे संस्थापक सुरज परदेशी यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या धाडसी आणि समर्पित सेवेमुळे "साउथ चा विलन" चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री पायल माने यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
सुरज परदेशी हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कोणत्याही संकटाचा सामना करण्याची त्यांची तयारी आणि सुरक्षा क्षेत्रातील कौशल्य यामुळे ते एक जबरदस्त उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून, त्यांनी आपल्या निपुणतेने बॉडीगार्ड क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
"सुरज परदेशी यांची कामगिरी विलक्षण आहे. ते अत्यंत शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करणारे सुरक्षारक्षक आहेत. अशा योद्ध्यांमुळेच आपल्या कलाकारांना सुरक्षित वाटते," असे पायल माने यांनी सांगितले.
सुरज परदेशी यांचा हा संघर्ष आणि मेहनत निश्चितच अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे. त्यांचे हे योगदान सन्माननीय असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे! तसेच रंगोत्सवाचा कार्यक्रम शांततेत व्यवस्थित रित्या पार पडला