गावठी कट्टा व काडतुस विक्री प्रकरणात सराईत गुन्हेगाराला अटक – सोनई पोलिसांची मोठी कारवाई
नेवासा (प्रतिनिधी )सोनई पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध शस्त्र विक्रीविरोधात मोठी कारवाई करत गावठी कट्टा व काडतुस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे
दिनांक 01 मार्च 2025 रोजी रात्री 10:30 वाजता, स.पो.नि. विजय माळी (प्रभारी अधिकारी, सोनई पोलीस स्टेशन) यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिवतेज शिवाजी जावळे (वय 30, रा. चांदा, ता. नेवासा) हा पांढऱ्या रंगाच्या वॉक्सवेगण वेंटो कार (MH 20 CH 1545) मधून गावठी कट्टा व काडतुस विक्री करण्याच्या उद्देशाने घोडेगाव-चांदा रस्त्यावर येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून 02 मार्च 2025 रोजी रात्री 12:20 वाजता घोडेगाव शिवारातील धनगरवस्ती फाट्यावर सापळा रचला.
संशयित कार स्थानकाजवळ उभी असताना पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहून आरोपीने गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलिसांशी झटापट करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला शिताफीने अटक केली.
मिळालेला मुद्देमाल:
झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून खालील वस्तू जप्त करण्यात आल्या –
1. गावठी कट्टा (स्टील बॉडी, प्लास्टिक कव्हर) – ₹50,000
2. सात जिवंत काडतुसे (KF 7.65 कोरीव अक्षरांसह) – ₹350
3. वॉक्सवेगण वेंटो कार (MH 20 CH 1545) – ₹5,00,000
4. एकूण जप्त मुद्देमाल: ₹5,50,350
याप्रकरणी पो. कॉ. ज्ञानेश्वर आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 50/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 132, आर्म्स ॲक्ट 3, 5, 7/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1), 37 (3) / 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास:
शिवतेज जावळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सोनई पोलीस स्टेशनमध्ये 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्रमुख गुन्हे
1. 114/2024 – (भा.दं.वि. कलम 279, 337, 338, 427)
2. 76/2014 – (भा.दं.वि. कलम 379, 411, 34)
3. 17/2014 – (भा.दं.वि. कलम 457, 380, 511)
4. 203/2014 – (भा.दं.वि. कलम 439, 380, 457, 454, 34)
5. 170/2014 – (भा.दं.वि. कलम 457, 380, 34)
6. 290/2014 – (भा.दं.वि. कलम 457, 380)
7. 261/2016 – (भा.दं.वि. कलम 395 – दरोडा)
8. 122/2021 – (भा.दं.वि. कलम 302, 34 – खून प्रकरण)
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत स.पो.नि. विजय माळी, पो.स.ई सुरज मेढे, पो.स.ई के.बी. राख, पो.हे.कॉ. डी.एम. गावडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर आघाव, पो.कॉ. पी.ए. क्षीरसागर आणि होमगार्ड जवानांचा सहभाग होता.