नेवासा तालुक्यातील खडका येथील युवकांचे कुंभमेळ्यात पवित्र स्नान – भक्तिभावाने घेतला गंगास्नान
नेवासा तालुक्यातील खडका येथील धर्मप्रेमी युवकांनी भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक पर्वांपैकी एक असलेल्या प्रयागराज कुंभमेळ्यात सहभाग घेत पवित्र गंगास्नान केले. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या या कुंभमेळ्यात विविध क्षेत्रातील भाविक देशभरातून एकत्र आले होते.
खडका गावातील दत्तात्रय भाऊसाहेब मैराळ, कांचन काकासाहेब भांगे, सागर सुनील भांगे आणि श्याम सुनील शिंदे यांनी कुंभमेळ्यात सहभागी होत गंगास्नानाचा धार्मिक लाभ घेतला. गंगास्नानानंतर त्यांनी संगम तटावर विविध धार्मिक विधी पार पाडले आणि आपल्या कुलदैवताची तसेच देवी-देवतांची मनोभावे पूजा केली.
गंगास्नानाचे महत्त्व आणि कुंभमेळ्यातील आध्यात्मिक अनुभूती
144 वर्षानंतर आलेला महा कुंभ मेळावा प्रयागराज येथे आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याला संपूर्ण देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात. पवित्र गंगास्नान केल्याने सर्व पापांचे क्षालन होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे खडका गावातील युवकांनीही या पवित्र यात्रेत सहभागी होत आध्यात्मिक समाधान मिळवले.
यावेळी दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे, सागर भांगे आणि श्याम शिंदे यांनी कुंभमेळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. त्यांनी गंगाजीची आरती, संत-महंतांचे प्रवचन तसेच धार्मिक अनुष्ठानांमध्ये भाग घेत कुंभमेळ्याचा संपूर्ण लाभ घेतला.