HMPV व्हायरसचे चीनमध्ये थैमान, वुहानमध्ये शाळा बंद; WHO ने अहवाल मागवला


कोरोना महामारीच्या नंतर जगभरातील सर्व देशांची घडी आता कुठे सुरळीत सुरू झाली आहे. असे असतानाच आता ज्या चीनमध्ये कोरोनाचा जन्म झाला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा ह्युमन मेटान्युमो (HMPV) या व्हायरसने थैमान घातले आहे. फक्त 10 दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत 529 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. WHO ने आता याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून चीन कडून तातडीने HMPV संदर्भात अहवाल मागवला आहे.

चीनमध्ये HMPV व्हायरस वेगाने पसरत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच या औषधांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू झाला असून हे औषध 41 डॉलर म्हणजेच जवळपास 3000 रुपयांना विकले जात आहे. जगभरात सुद्दा HMPV व्हायरसचा शिरकाव झाला असून हिंदुस्थान, मलेशिया, जपान आणि कझाकिस्थान मध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच स्पेनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून हॉस्पीटलच्या बाहेर रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्पेनमधील अॅलिकांटा येथे “इन्फ्ल्युएंझा A” ची 600 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. जगभरातील या घटनांमुळे जागतिक आरोग्य संघटना आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. चीनने HMPV व्हायरस संदर्भात लपवा लपवी करत असून त्यांनी अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे WHO ने चीनला HMPV संदर्भात सविस्तर माहिती देण्याच आदेश दिले आहे.

हिंदुस्थानाध्ये HMPV व्हायरसची आतापर्यंत 8 प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रामध्ये 13 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा बाधित झाला आहे. तसेच गुजरातमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये 1-1 आणि कर्नाटक व तामिळनाडूमध्ये 2-2 प्रकरणे समोर आली आहेत.



        
        
        
        
            
                        
            

                                                    

    
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.