नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने गोशाळा सुरूगजानन ग्रुपच्या वतीने गोमतेला चारा दान

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने गोशाळा सुरू गजानन ग्रुपच्या वतीने गोमतेला चारा दान

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रेरणेने गोशाळा सुरू करण्यात आली असून येथील गजानन ग्रुपच्या वतीने गोमतेला चारा दान करण्यात आला.
   नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गजानन ग्रुपच्या वतीने गोमातेला हिरवा चारा देऊन नंदकुमार पाटील यांचा जन्मदिन इतर खर्चांना फाटा देऊन साजरा करण्यात आला.याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के व नंदकुमार पाटील यांच्या हस्ते गोमतेला चारा देण्यात आला.गोशाळेस चारा देण्याच्या उपक्रमाचे यावेळी नंदकुमार पाटील यांनी कौतुक केले.
    संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गोशाळेला अशा उपक्रमातून सर्वांनी हातभार लावावा तसेच माऊलींच्या या कर्मभूमीचे महत्व वाढविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे,दररोज माऊलीचे दर्शनासाठी कसे येता येईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन हभप देविदास महाराज म्हस्के यांनी यावेळी बोलतांना केले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,मेडिकल असोसिएशनचे डॉ.शंकरराव शिंदे,यशवंत स्टडी क्लबचे महेश मापारी,नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,उद्योजक प्रमोद शिंदे,मूर्तीकार बजरंग ईरले,अनिल शिंदे,नेवासा कॉलेजचे प्रा.देविदास साळुंके,पत्रकार सौरभ मुनोत,योगेश रासने,प्रशांत कानडे, लक्ष्मणराव नाबदे,निलेश जोशी,देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे,संत सेवेकरी शिवाजी होन, दामोदर पवार, गोरख भराट उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.